कोकणातील महिला भजन मंडळाची अनोखी परंपरा

कुडाळ : कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते दशावतारी नाटक, नमन आणि भजन. पण भजन म्हटलं की सर्वांना आठवतो तो पुरुषांचा आवाज—कारण अनेक पिढ्यांपासून भजन हे पुरुषांचंच क्षेत्र मानलं गेलं. हीच परंपरागत चौकट मोडून काढण्यासाठी खानोलीतील सिद्धेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ पुढे आलं.


भाविका लक्ष्मण खानोलकर, आकांक्षा लक्ष्मण खानोलकर, पूर्वा सुभाष खानोलकर, भार्गवी हेमंत खानोलकर, लावण्या सामंत, नक्षत्रा सदाशिव खाडे, अक्षता जगदीश खाडे, भार्गवी दत्तात्रय प्रभू, दीक्षा भगवान पालकर आणि सिद्धी सुनिल सावंत या दहा मैत्रिणींनी २०१८ मध्ये या मंडळाची स्थापना केली. जिथे ‘बाई म्हणजे चूल आणि मूल’ असा समज असलेल्या समाजात, या तरुणींनी स्वतःच्या कलेतून कोकणातल्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला.


लहानग्या चिमुकल्यांपासून ते पंचवीस वर्षांच्या तरुणींपर्यंत सगळ्या या मंडळाचा भाग आहेत. सूर लावणे, तबला-पखवाज वाजवणे, गायन—सगळंच त्या स्वतः करतात. भजन केवळ पुरुषांच्या वाट्याला आलं आहे ही धारणा त्यांनी आपल्या आवाजातून आणि ताकदीतून बदलून दाखवली.


या मंडळातील भाविका खानोलकर सांगते, “भजनी मंडळ सुरू करण्याची कल्पना माझ्या बाबांची होती. नवरात्रीत आम्ही भजन सादर करतो आणि मी स्वतः दशावतारी कलाकार असल्याने दोन्ही जपते. दिवसभर काम करून दमलो तरी रात्री उर्जेने भजन करतो. आम्हाला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. सिंधुदुर्गातील हे पहिलं महिला वादकांचं भजन मंडळ असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”


याचबरोबर या मुली कुठल्याही अपेक्षेशिवाय गावोगावी जाऊन आपली कला सादर करतात. स्थानिक लोक देखील त्यांचं प्रचंड कौतुक करतात. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावी भजन या मुली आज सादर करत आहेत.


गणपती आणि नवरात्रीत तर या महिला भजन मंडळाच्या कार्यक्रमांची धूम असते आणि कोकणभर त्यांच्या आवाजाचा दरारा ऐकायला मिळतो.

Comments
Add Comment

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण

अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळ

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय