कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या महापालिकेच्या सूचना
मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.
२८ सप्टेंबर व्यतिरिक्त २९ सप्टेंबर रोजीही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी सकाळीही मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. कोकण-गोवा मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी विांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता रविवारपाठोपाठ सोमवारीही मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट
हवामान खात्याने रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे. दुसरीकडे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २८ सप्टेंबरसाठी राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सतर्कता बाळगण्याचे आवाहन
हवामान विभागाने पुढील दोन दिवस (दि. २८, २९ सप्टेंबर) राज्यात ऑरेज रेड अर्लट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सभाव्य अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अनुमानानुसान संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.