प्रभादेवी पूलबाधितांचे नजीकच्या परिसरातच होणार पुनर्वसन

मुंबई : शिवडी ते वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रभादेवी द्विस्तरीय पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील ८३ रहिवाशांसाठी अखेर म्हाडाने आसपासच्या परिसरातील ११९ घरे शोधली आहेत. या घरांची यादी नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सादर करण्यात आली आहे.


आता रहिवाशांच्या पसंतीनुसार घरे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या पसंतीनुसार ११९ पैकी ८३ घरे एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएकडून शीघ्रगणकाच्या ११० टक्के दराने रक्कम घेण्याचा म्हाडाचा प्रस्ताव आहे. अटल सेतूला जोडणारा शिवडी- वरळी उन्नत रस्ता प्रभादेवी पूल ओलांडून जात आहे. त्यामुळे जुना पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. जुन्या पुलाचे पाडकाम सध्या एमएमआरडीए करीत आहे.


या पुलाच्या कामात हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारती बाधित होत असून यात ८३ घरे आहेत. या ८३ रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या घरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली घरे या रहिवाशांना कायमस्वरुपी दिली जाणार आहेत.


Comments
Add Comment

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण

Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा