मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलची हत्या, पत्नी आणि मुलाला अटक


मुंबई : शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रवीण सूर्यवंशी या ५२ वर्षांच्या पोलीस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आधी पोलिसांनी केली होती. मात्र सखोल तपासाअंती पोलिसांनी प्रवीण सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्याच्या पत्नीला आणि मुलाला अटक केली आहे.


प्रवीणची पत्नी स्मिता सूर्यवंशी (३८) आणि मुलगा प्रतिक सूर्यवंशी (२०) या दोघांना पोलिसांनी संशयावरुन अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी प्रवीण सूर्यवंशी याला घरात बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सूर्यवंशीचा काही काळाने उपचारांअभावी घरातच मृत्यू झाला. यानंतर स्वतःवर संशय येऊ नये यासाठी प्रवीणची पत्नी आणि मुलगा या दोघांनी एक बनावट चिठ्ठी तयार केली. ही आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिठ्ठी असल्याचा बनाव करण्यात आला. चिठ्ठीत 'माझ्या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरू नये' असे वाक्य होते आणि त्याखाली प्रवीण सूर्यवंशीचे नाव होते. सुरुवातीला पोलिसांनी कामाच्या ताणातून टोकाचे पाऊल उचलताना धडपडला आणि शेवटी अपघाती मृत्यू झाला असा तर्क केला होता. पण प्रवीणच्या नातलगांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. अखेर पोलिसांनी प्रवीणच्या मृत्यू प्रकरणी नव्याने तपास केला. या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समजली.


प्रवीण सूर्यवंशीच्या शरीरावर तब्बल ३८ बाह्य जखमा आढळल्या. प्रचंड रक्तस्त्राव आणि धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रवीण सूर्यवंशी आणि त्याच्या पत्नीमध्ये एटीएम कार्ड भावाला देण्यावरून वाद झाला होता. वाद वाढला आणि प्रवीण सूर्यवंशीला त्याच्या पत्नीने आणि मुलाने बेदम मारहाण केली. यानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला होता. पण पोलिसांच्या सखोल तपासातून सगळा प्रकार उघड झाला. यानंतर पोलिसांनी प्रवीण सूर्यवंशीच्या पत्नीला आणि मुलाला अटक केली आहे.


Comments
Add Comment

भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बोलती बंद

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या आमसभेत बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी

पंतप्रधान मोदींच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी 4G सेवेचे लोकार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’

रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसराला रविवारी रेड अलर्ट

मुंबई : रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई

भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई, शनैश्वर विश्वस्त मंडळ बरखास्त; देवस्थानच्या चाव्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

अहिल्यानगर : शनी पीडेचा त्रास होऊ नये यासाठी लाखो भाविक शनी शिंगणापूर येथे शनीदेवाच्या दर्शनाला येतात. पण या

सोनम वांगचुकचे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन, तपास सुरू

नवी दिल्ली : लडाख या केंद्रशासित प्रदेशातील हिंसेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या सोनम

बरेलीत दंगल, मौलाना तौकीरला अटक; ४८ तासांसाठी इंटरनेट बंद

बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेलीत शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर दंगल भडकली होती. नमाज अदा करुन आलेल्यांनी हिंसा