मध्य रेल्वेवर भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम


मुंबई : भायखळा आणि शीव स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यासाठी शनिवार २७ सप्टेंबर रोजी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.


मध्य रेल्वे भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव रेल्वे ओव्हर ब्रिज येथे फुट ओव्हर ब्रिजचा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात आले आहेत. पहिला ब्लॉक शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे. हा ब्लॉक भायखळा आणि परेल दरम्यान अपडाउन धीम्या व जलद मार्गावर घेण्यात आला आहे. तर दुसरा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे. दादर आणि कुर्ला दरम्यान अपडाऊन धीम्या आणि जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे.



कर्जत स्थानकात विशेष ब्लॉक


कर्जत स्थानकात प्री-नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. कर्जत स्थानकावर २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वेवरील उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना कर्जत ते खोपोली दरम्यान प्रवास करता येणार नाही. मध्य रेल्वेने नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३ दरम्यान, कर्जत फलाट क्रमांक ३ ते चौक स्थानकादरम्यान २७ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे.




Comments
Add Comment

दसऱ्याला सोने लुटतात, तर दारातच लावा ‘आपटा’

मुंबईभर आपट्याची झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प मुंबई : दसऱ्याला सोने लुटताना प्रत्येकाने आपल्या दारात

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च करणार

पुढील तीन महिन्यांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण आणि धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी

वर्धापन दिनी चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रात आज पूरग्रस्थ स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात

एमपीएससीची २८ सप्टेंबरची परीक्षा या दिवशी होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. नव्या

राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या

मुंबईत ॲप-आधारित वाहन चालकांवर कारवाई; नियम मोडल्यास थेट दंड आणि एफआयआर!

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न