Sameer Wankhede : समीर वानखेडेचा आर्यन खानवर मानहानीचा आरोप; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शन पदार्पणामुळे चर्चेत असतानाच, पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकलेला दिसतो आहे. आर्यन खानने नुकतीच “बॅड्स ऑफ बॉलीवूड” नावाच्या वेब सिरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ही वेब सिरीज स्ट्रीमिंग सुरू होताच, आयआरएस (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा (Defamation) खटला दाखल केला आहे. वानखेडे यांनी दाखल केलेल्या या खटल्यामुळे बॉलीवूड आणि कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी (Hearing) होणार आहे.


बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या 'रेड चिलीज' (Red Chillies) निर्मित “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजला आता कायदेशीर आव्हान मिळाले आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी या सिरीजच्या विरोधात जोरदार आक्षेप नोंदवला आहे. समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आर्यन खान आणि संबंधित निर्मात्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वेब सिरीजमध्ये अनावश्यक हिंसाचार दर्शवण्यात आला आहे. पात्र आणि घटना वाईट पद्धतीने चित्रित केल्या आहेत. या सिरीजने देशातील ड्रग्ज विरोधी एजन्सी (Anti-Drug Agency) आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची (Law Enforcement Agencies) प्रतिमा अत्यंत नकारात्मक पद्धतीने दाखवून त्यांची बदनामी केली आहे. वानखेडे यांनी दावा केला आहे की, या नकारात्मक चित्रणामुळे सामान्य जनतेचा कायद्याच्या संस्थांवरील विश्वास (Public Trust) तुटला आहे.



सत्यमेव जयते'च्या अवमानाचा आरोप


आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खान याच्या "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या वेब सिरीजवर केलेला मानहानीचा आरोप आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. वानखेडे यांनी सिरीजमध्ये केवळ नकारात्मक चित्रणच नव्हे, तर भारतीय कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, या वेब सिरीजमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह दृश्ये आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, सिरीजमधील एका पात्राने राष्ट्रीय चिन्हाचा आणि देशाचा मान असलेल्या “सत्यमेव जयते” या घोषणेचा अपमान केला आहे. वानखेडे यांचे म्हणणं आहे की, वेब सिरीजमधील ही दृश्ये थेट माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांचे उल्लंघन करतात. राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याचा आरोप अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.





मानहानीप्रकरणी २ कोटींची मागणी


आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनातील “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला मानहानीचा खटला आता थेट आर्थिक भरपाईच्या मागणीपर्यंत पोहोचला आहे. वानखेडे यांनी सिरीजमुळे झालेल्या अपमानाबद्दल मोठी मागणी केली आहे. वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, या वेब सिरीजमध्ये केवळ त्यांचीच नव्हे, तर त्यांच्या समर्थकांची देखील जाणूनबुजून बदनामी आणि अपमान करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या याचिकेत प्रामुख्याने मागण्या केल्या आहेत, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेमोरियल बिल्डिंग आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ कारवाई करावी. या आक्षेपार्ह वेब सिरीजच्या प्रदर्शनावर कायमची बंदी घालावी. त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी आणि मानहानीपोटी ₹२ कोटी रुपयांची भरपाई मिळावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वानखेडे यांनी ही भरपाईची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी न ठेवता, ती संपूर्णपणे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा प्रस्ताव न्यायालयात मांडला आहे.



समीर वानखेडे का आहेत नाराज?


या सिरीजमधील एका विशिष्ट दृश्यात दडले आहे, असे बोलले जात आहे. या दृश्यामुळे नेटकऱ्यांना आणि वानखेडे यांना असे वाटते की, आर्यन खानने २०२१ मधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्याला अटक करणाऱ्या माजी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल थेट टिप्पणी (Comment) केली आहे. एक पोलीस अधिकारी एका भव्य पार्टीमध्ये धाड टाकतो. तेथे त्याला एक व्यक्ती सिगारेट ओढताना दिसतो. तो अधिकारी त्या व्यक्तीची चौकशी सुरू करतो. मात्र, हा व्यक्ती बॉलीवूडशी संबंधित नाही, हे लक्षात येताच तो अधिकारी लगेच रस गमावतो आणि त्याला काहीही कारवाई न करता सोडून देतो.हे दृश्य आर्यन खानने जानूनबुजून आपल्यावर आणि २०२१ च्या तपासावर केलेली टीका आहे, असे समीर वानखेडे आणि त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. २०२१ मध्ये आर्यन खानला केवळ ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली नव्हती, तर या संपूर्ण प्रकरणाला 'टारगेटेड' (Targeted) चौकशीचे स्वरूप होते, असा आर्यनच्या बाजूचा दावा होता.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या