New RBI Digital Transcations Rules: Online Digital व्यवहारांसाठी आरबीआयची नवी नियमावली

प्रतिनिधी:आरबीआयकडून डिजिटल पेमेंट व्यवहारासांठी नियमनात बदल करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.डिजिटल पेमेंट व्यवहार प्रमाणीकरणासाठी यंत्रणेच्या चौकटीबाबत (Framework) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने त्यां ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. विशिष्ट तरतुदींसाठी हे निर्देश १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील जो पर्यंत इतर काही सूचना नाही असे आरबीआयने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी डिजिटल व्यवहार एसएमएसतील माध्यमातून एक टप्यात हो त होती ती आता दोन टप्प्यांत पडताळणी केली जाऊ शकते.रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निवेदनात प्रमाणीकरण घटक (Authentication Factors) मध्ये अनिवार्य द्वि-घटक (Two Factors) प्रमाणीकरण, जोखीम-आधारित तपासणी, सीमापार व्यवहारांमध्ये (Abro ad Transcations) व अतिरिक्त प्रमाणीकरण, इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन देणे आणि जारीकर्त्यांच्या (Issuers) नेमक्या जबाबदाऱ्या यासारख्या प्रमुख मुद्यांवर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे.


आरबीआयच्या निवेदनातील माहितीनुसार, भारतातील सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांना प्रमाणीकरणाच्या दोन घटकांच्या मानकांची (Two Authentication Standards) पूर्तता करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणासाठी कोणताही विशिष्ट घटक अनिवार्य नस ला तरी, डिजिटल पेमेंट इकोसिस्टमने प्रामुख्याने अतिरिक्त घटक म्हणून एस एम एस (SMS) आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) स्वीकारला आहे.त्यात इतर गोष्टींबरोबरच पासवर्ड, एसएमएस-आधारित ओटीपी, पासफ्रेज, पिन, कार्ड हार्डवेअर, सॉफ्टवेअर टो कन, फिंगरप्रिंट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बायोमेट्रिक्स (डिव्हाइस नेटिव्ह किंवा आधार-आधारित) यांचा समावेश असू शकतो असे आरबीआयने म्हटले आहे.


आरबीआय म्हणते की सर्व डिजिटल पेमेंट व्यवहार परिच्छेद -५(एफ) मध्ये परिभाषित (Redefined) केल्याप्रमाणे प्रमाणीकरणाच्या किमान दोन वेगळ्या घटकांद्वारे प्रमाणित केले जातील, जोपर्यंत सूट दिली जात नाही.२५ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आर बीआयच्या निर्देशांनुसार 'व्यवहाराशी संबंधित समजलेल्या जोखमीच्या आधारावर, किमान द्वि-घटक प्रमाणीकरणाच्या पलीकडे अतिरिक्त तपासण्यांचा अवलंब केला जाऊ शकतो. जारीकर्ता उच्च-जोखीम व्यवहारांसाठी सूचना आणि पुष्टीकरणासाठी डिजीलॉक रचा वापर करण्याचा देखील शोध घेऊ शकतात.' आरबीआय म्हणते की कार्ड जारीकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सर्व सीमापार (Cross Boarder) सीएनपी व्यवहार हाताळण्यासाठी जोखीम-आधारित यंत्रणा देखील स्थापित करावी.

Comments
Add Comment

२०३० पर्यंत मुंबई पुण्यात ३.५ दशलक्ष परवडणाऱ्या घरांसाठी ७०००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार - JLL NAREADCO Report

नवीन परिघीय क्लस्टर्स (New Peripheral Clusters) मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सुलभ घरमालकीच्या संधी देत असल्याने परवडणाऱ्या

सर्वोच्च न्यायालय सुनावणीत Vodafone Idea काहीसा दिलासा ! कंपनीचा शेअर ६.९१% कोसळला

नवी दिल्ली: डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम व व्होडाफोन आयडिया यांच्यातील तिढा कोर्ट कचेरीतून सुटले का हा प्रश्न उपस्थित

Central Railway : मध्य रेल्वेचा 'मास्टरप्लॅन'! सीवूड्स-उरण मार्गावर २० नव्या लोकल धावणार, ऑक्टोबरपासून प्रवास होणार सुपरफास्ट

नवी मुंबई : सिवूड्स दारावे-बेलापूर-उरण या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत

Sameer Wankhede : समीर वानखेडेचा आर्यन खानवर मानहानीचा आरोप; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शन पदार्पणामुळे चर्चेत असतानाच,

सनफार्माचा शेअर धडाधड कोसळला 'या' कारणामुळे विश्लेषक म्हणतात...

मोहित सोमण: युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फार्मा उत्पादनावरील टॅरिफ वाढीचा फटका आज सन फार्मा

मोठी बातमी: ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची 'ही' नवी तीन तीन गिफ्ट मिळणार

प्रतिनिधी: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात आठव्या वेतन