वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर


मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला आहे. एकूण १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघात नितीश रेड्डी आणि देवदत्त पडिकल यांना संधी मिळाली आहे पण इंग्लंड दौऱ्यात सहभागी झालेल्या करुण नायर आणि अभिमन्यू ईश्वरन यांना वगळण्यात आले आहे.


आशिया चषक २०२५ या टी २० स्पर्धेचा अंतिम सामना रविवार २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्यासाठी भारत पात्र झाला आहे. या सामन्यानंतर भारताला जास्त विश्रांती मिळणार नाही. लगेच गुरुवार २ ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. तर दुसरा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.


भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), एन. जगदीसन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका


पहिली कसोटी - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद - २ ऑक्टोबरपासून सुरू - थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वा.


दुसरी कसोटी - अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली - १० ऑक्टोबरपासून सुरू - थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वा.


Comments
Add Comment

India vs Bangladesh: अभिषेकचे धावांचे वादळ आणि भारताच्या गोलंदाजांचा मारा, बांग्लादेशला चारली पराभवाची धूळ

दुबई: अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकी माऱ्यामुळे भारताने आशिया कप २०२५ च्या

Asia cupमध्ये पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम

अबुधाबी : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ५ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताला बांग्लादेशचे आव्हान

अबुधाबी :आशिया कपमध्ये भारत सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील

Pakistan vs Sri Lanka :  पाकिस्तानच्या गोलंदाजांचा क़हर, श्रीलंकेला १३३ धावांवर रोखले

अबुधाबी:  आशिया कपमधील सुपर ४मध्ये आज पाकिस्तानचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय महिला संघाला दंड

दुबई : अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात स्लो

IND vs PAK: भारताने धुलाई केल्यानंतर पुन्हा ICCकडे गेला पाकिस्तान, आता ही केली तक्रार

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.