विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने हेटमायर आणि पॉवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर २० षटकांत सहा बाद २५४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेचा डाव १७.४ षटकांत १४७ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजचा १०७ धावांनी दणदणीत विजय झाला.  विंडीजकडून ३४ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकार मारत ८५  धावा करणारा शिमरॉन हेटमायर सामनावीर झाला.


झिम्बाब्वेची फलंदाजी


झिम्बाब्वेकडून तदिवानाशे मारुमणीने १४, ब्रायन बेनेटने ५, डायन मायर्सने २८, रायन बर्लने शून्य, सिकंदर रझाने २७, टोनी मुनयोंगाने १४, ताशिंगा मुसेकिवाने शून्य, ब्रॅड इव्हान्सने ४३, ग्रॅमी क्रेमरने शून्य, ब्लेसिंग मुजराबानीने शून्य, रिचर्ड नगारावाने नाबाद ७ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने ४, अकील होसेनने ३, मॅथ्यू फोर्डेने २, जेसन होल्डरने १ विकेट घेतली.



वेस्ट इंडिजची फलंदाजी


वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने ९, शाई होपने १४, हेटमायरने ८५, पॉवेलने ५९, शेरफेन रुदरफोर्डने नाबाद ३१, रोमारियो शेफर्डने २१, जेसन होल्डरने १३, मॅथ्यू फोर्डेने नाबाद १ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने २१ अवांतर चेंडू टाकले. विंडीजच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजराबानी आणि रिचर्ड नगारावाने प्रत्येकी २ तर ग्रॅमी क्रेमर आणि ब्रॅड इव्हान्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.


विंडीजकडून शिमरॉन हेटमायरने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकार मारत ८५ तर रोवमन पॉवेलने ३५ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५९ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या