सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद; वाहनांच्या रांगा

पुणे : राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झाल्यानं अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलाय. नदीचं पाणी लांबोटी इथं सोलापूर-पुणे महामार्गावर आलं आहे. यामुळे सोलापूर पुणे महामार्ग रात्री ११ वाजल्यापासून बंद करण्यात आलाय. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावरून वाहतूक बंद केली आहे. सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकसुद्धा बंद केल्याची माहिती समोर येत आहे. सीना नदीचं पाणी ओसरेपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. वाहतूक बंद असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय.

सीना नदीच्या पुरामुळे रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे. सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचा वेग सीना नदीवरील पुलावर ३० किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर करमाळा तालुक्यात मुंडेवाडी इथं पाणी रेल्वे पुलाजवळ पोहोचलंय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सकाळी ते मुंबईतून सोलापूरला जाणार आहेत. माढा तालुक्यातील निमगाव, दारफळ या गावांसह भागातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर लातूरला उजनी, औसा, नणंद, औराद शहाजनी या भागात दौरा करणार आहे

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध