Solapur Flood : पहिला महामार्ग बंद अन् आता 'वंदे भारत'लाही फटका...सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरमध्ये पूरस्थिती गंभीर

सोलापूर : राज्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. सोलापुर जिल्ह्यातील अहिल्यानगर आणि धाराशिव परिसरातील सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातून तसेच भोगावती नदीमधून सोडलेले पाणी सीना नदीत आले आहे. यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूरसह जवळपास २९ गावांतील शेतकरी आणि नागरिकांचे घर, शेती आणि पिकं पाण्याखाली गेले आहेत. रस्ते जलमय झाले असून राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे. तसेच रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे एक्स्प्रेस व वंदे भारत गाड्या थांबून आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


सोलापूर रेल्वे स्थानकावरच वंदे भारत एक्स्प्रेस थांबून आहे. यासोबतच इतरही तीन एक्स्प्रेस रखडल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरातल्या माढामधील निमगाव आणि दारफळ या गावांची पाहणी केली. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. दारफळ, वाकाव, राहुलनगर, उंदरगाव, केवड या गावांना पाण्याने वेढा दिलाय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला.



वंदे भारतसह चार एक्स्प्रेस गाड्या अडकल्या


सोलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेस थांबलेली असून, त्याच मार्गावर आणखी तीन एक्स्प्रेस गाड्या देखील अडकल्या आहेत. यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ या पूरग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः दारफळ, वाकाव, राहुलनगर, उंदरगाव आणि केवड गावांना पाण्याने वेढा दिला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांचा पूरग्रस्त भाग दौरा सुरू आहे. याअंतर्गत, सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा त्वरित दौरा करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला आहे.



मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता


राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तरपणे तपासण्यात आले. हवामान खात्याच्या अहवालानुसार २७ ते २८ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा अतिवृष्टीची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या अंदाजानुसार २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, फडणवीसांच्या मते प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून मदत त्वरित देण्यात येईल. शिवाय शनिवार आणि रविवार राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाला सर्वांनी तत्काळ खबरदारी घेण्याचे आदेश देखील दिले आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : अतिवृष्टीने माढ्यात शेतीचं मोठं नुकसान, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट पाहणी, मदतीचे आश्वासन

सोलापूर : महाराष्ट्रात पावसाचा तुफान थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली

Ajit Pawar : अतिवृष्टीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांकडून मदतीचा मोठा दिलासा; अटसुद्धा रद्द

धाराशिव : राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांना मोठा फटका

शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डीचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन

पुणे : शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद; वाहनांच्या रांगा

पुणे : राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण

Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर, राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सातत्याने सुरू असलेल्या

नागपूर-नागभीड रेल्वे मार्गाच्या ब्रॅाडगेजसाठी शासन हिश्श्याच्या ४९१ कोटी ५ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी

नागपूर : नागपूर-नागभीड दरम्यानच्या ११६.१५ किलोमीटरच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॅाडगेज मार्गात रुपांतर