‘ए आय’च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल

निती आयोग करणार सिंधुदुर्गातील ‘ए आय’ प्रकल्पाचा अभ्यास - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे


मुंबई : ‘ए आय’ तंत्रज्ञानाने प्रशासन व सुरक्षा व्यवस्था हाताळणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. १ मे २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील ८ विभागांचे कामकाज कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून सुरू असून याचा अभ्यास करण्यासाठी पुढील महिन्यात निती आयोगाचे पथक येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. मंत्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा देशात पहिला ‘ए आय’ युक्त जिल्हा झाल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, यामुळे ग्रामीण जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ‘ए आय’च्या माध्यमातून नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटक यांची सुरक्षितता निश्चित झाली आहे. तसेच महामार्गावरील अपघात रोखणे, त्याचा तपास करणे, जिल्ह्यातील हत्तींचा प्रश्न मार्गी लावणे शक्य झाले आहे. अनेक प्रलंबित प्रकरणे यामुळे मार्गी लावली जात आहेत. जिल्ह्यातील समस्यांवर उत्तरे शोधली जात असल्याचे राणे यांनी सांगितले.


मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ए आय’ मॉडेल याचा अभ्यास आता निती आयोग करणार आहे. हे मॉडेल देशपातळीवर राबवण्याविषयीही निती आयोग अभ्यास करणार आहे. जिल्ह्यातील नगर विकास, परिवहन पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अशा महत्वाच्या विभागांमध्ये सध्या ‘एआय’ तंत्रज्ञान आधारित यंत्रणा सक्रिय आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांनाही हे मॉडेल राबवता यावे यासाठी लवकरच मंत्रालयीन स्तरावर याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा २५ सप्टेंबरपासून शुभारंभ

नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान; नागरिकांना सायबर सुरक्षा व

राज्यातील १९.२२ लाख शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींची मदत जाहीर !

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९

देशात प्रदूषित नद्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल; ५४ नद्यांची भीषण अवस्था, मुंबईतील नद्या मरणासन्न का?

मुंबई : एकेकाळी गावागावांतून वाहणाऱ्या नद्या या जीवनदायिनी होत्या. त्यांचं पाणी पिऊन माणसं जगत होती, शेतं

पुराचा तडाखा बसलेल्यांना जाहीर झाली मदत, दिवाळीआधी मदत देण्याचे संकेत

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांना पावसाचा तडाखा बसत आहे. मराठवाड्यासह विविध

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या

Katrina Kaif Pregnancy : कुणी तरी येणार येणार गं! विकी-कतरिनाकडे लवकरच येणार गोड पाहुणा, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत