सकाळच्या सत्रात एकदम सुरूवातीला घसरगुंडी आता Recovery आयटी शेअर्समध्ये घसरण तर अदानी शेअर्स जोरदार नक्की काय चाललंय बाजारात जाणून घ्या

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी जागतिक अस्थिरतेचा फटका सर्वाधिक प्रमाणात आयटी शेअरला बसल्याने शेअर बाजारात घसरगुंडी उडाली आहे. प्रामुख्याने आज अस्थिरता निर्दे शांक (VIX Volatility Index) ५.०४% उसळल्याने बाजारातील गोंधळाचे वातावरण अधोरेखित झाले आहे. भारत व युएस यांच्यातील तोडगा निघण्याची धुसर झाल्याने तसेच प्रामुख्याने व्हाईट हाऊसकडून आयटी क्षेत्रातील नवोदित विदेशी कर्मचाऱ्यांना १ ला ख डॉलर्सची प्रवेश फी जाहीर केल्याने युएस भारत संबंधात पेचप्रसंग आणखी वाढला. सेन्सेक्स सुरूवातीच्या सत्रातील सुरुवातीला ४०५.३० अंकाने व निफ्टी १०३.६७ अंकाने घसरला होता मात्र सकाळी ९.४५ वाजेपर्यंत घसरण आटोक्यात आली असून सेन्सेक्स ७ २.९७ अंकाने व निफ्टी केवळ ३.४०% अंकांने घसरला आहे. विशेषतः आज आयटी शेअर्ससह मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारात घसरगुंडी दिसून आली आहे.


या गोंधळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आपली गुंतवणूक होल्डवर ठेवतील का परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करतील यावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल. तसेच दुसरीकडे चीनच्या सेंट्रल बँकेने आप ल्या व्याजदरात कपात न करता सलग तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवल्याने आज आशियाई बाजारात सुरूवातीच्या कलात मोठी वाढ झाली. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर अमेरिकेन बाजारातील फंडामेंटल डळमळीत झाले अ सले तरी बाजारातील शेअर्समध्ये व डॉलरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे काल युएस बाजारातही वाढ झाली होती.


लवकरच भारत व युएस यांच्यातील तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात असताना अमेरिकेतील प्रशासनाकडून आयटीचा घेतलेला निर्णय दोघांच्या संबंधात आणखी वितुष्ट वाढवू शकतो. आज भारतीय बाजारातील अस्थिरता कायम राहण्याचे संकेत मिळत अ सल्यानेच शेअर बाजारात अखेरच्या सत्रात काय निर्णय गुंतवणूकदार देतात याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. आयटी (२.३८%) शेअर्समध्ये झालेल्या घसरणीसह आज सर्वाधिक घसरण फार्मा (०.८०%), हेल्थकेअर (०.६२%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.५२ %) समभागात झाली आहे. तर सर्वाधिक वाढ मेटल (०.६४%) फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.३९%), पीएसयु बँक (०.५४%), रियल्टी (०.५४%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ अदानी पॉवर (१६.०६%), एससीआय (७.३७%), नेटवेब टेक्नॉलॉजी (५.३९%), अनंत राज (४.४०%), गार्डन रीच (४.२८%), अदानी ग्रीन (३.२३%), अदानी टोटल गॅस (३.०३%), हिंदुस्थान कॉपर (२.७ ७%), पिरामल एंटरप्राईजेस (२.५०%), पीएनसी इन्फ्राटेक (२.४९%), कोचीन शिपयार्ड (२.२७%), अदानी एंटरप्राईजेस (२.३९%), वोडाफोन आयडिया (२.२६%), होडांई मोटर्स (१.९९%), युनायटेड स्पिरीट (२.१९%), झी एंटरटेनमेंट (१.८५%), एसबीआय ला ईफ इन्शुरन्स (१.८७%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (१.७८%), येस बँक (१.५६%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील सुरुवातीच्या कलात सर्वाधिक घसरण टेक महिंद्रा (३.९३%), परसिस्टंट सिस्टिम (३.९२%), एलटीआय माईंड ट्री (३.४७%), कोफोर्ज (३.०७%), न्यूजेन सॉफ्टवेअर (२.६१%), इन्फोसिस (२.३२%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.२५%), टीसीएस (२.१८%), विप्रो (२.१५%), टाटा टेक्नॉलॉजी (२.०८%), साई लाईफ (१.९८%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (१.७८%), सम्मान कॅपिटल (१.५६%), श्री रेणुका शुगर (१.५५%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.४३%), भारती हेक्साकॉम (१.२२%), पीबी फिनटेक (१.०४%) सम भागात झाली आहे.


त्यामुळे आजच्या बाजारात अस्थिरता कायम राहणार असून पुढील लक्ष परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांच्या कलाकडे असेल तर घरगुती गुंतवणूकदार किती गुंतवणूक राखतील यावर बाजाराची सपोर्ट लेवल नि श्चित होईल. दरम्यान आज आयटी शेअरमधील घसरणीमुळे बाजारात घसरण झाली असली तरी अदानी समुहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे निर्देशांकातील घसरण रिकव्हर होण्यास मदत झाली.

Comments
Add Comment

रामदेव बाबांकडून जनतेला गिफ्ट पतांजली उत्पादने झाली स्वस्त 'हे' आहेत नवे दर

प्रतिनिधी: रामदेव बाबांकडून दिवाळीचे अँडव्हान्स गिफ्ट ग्राहकांना मिळणार आहे. जीएसटी दर कपातीमुळे आता एफएमसीजी

GST 2.0: मोदी सरकारकडून आजपासून गिफ्ट काय गोष्टी स्वस्त व महाग होणार वाचा संपूर्ण यादी

प्रतिनिधी: मोदी सरकारने जीएसटी कर २.० करसंचरनेसह मोठ्या प्रमाणात करात कपात केली होती. काल पंतप्रधानांनी आपल्या

Irfan Pathan On Ind vs Pak Asia Cup 2025 : साहिबजादाची नापाक हरकत! गोळीबाराची ॲक्शन पाहून इरफान पठाण Live कॉमेंट्रीमध्ये म्हणाले…

आशिया चषक २०२५ च्या सुपर-४ फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. या रोमांचक सामन्यात

कोट्यावधी आयटी शेअर्समध्ये 'सेल ऑफ' म्युच्युअल फंडात धूळधाण

प्रतिनिधी:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात मोठी वाढ लादल्यानंतर झालेल्या

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पुन्हा लोळवले, आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा केला पराभव

दुबई: आशिया कप २०२५च्या सुपर ४मध्ये भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा