सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला


धनगर आरक्षणासाठी उपोषणस्थळी जात असताना घडली घटना


जालना (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा प्रकार रविवारी घडला.


सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट जाण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील, असे पोलिसांना वाटले नव्हते. एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून सदावर्ते यांची गाडी गाठण्यात यश मिळवले.
या आंदोलकांनी सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीवर धावून जात काचेवर फटके मारले.


मुंबईतही गाडीच्या काचा फोडल्या होत्या : यापूर्वी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना काही मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून सदावर्ते यांना अनेकदा इशारेही देण्यात आले होते. मात्र, सदावर्ते यांनी जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करणे सुरूच ठेवले होते.

Comments
Add Comment

मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्प हे ठाणेकरांसाठी नवे श्वासवायू - परिवहन मंत्री

मुंबई : मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए

राहुरीत पोलिसांचा मोठा छापा : ३१ लाखांचे अवैध फटाके जप्त

राहुरी : राहुरी तालुक्यातील चिंचोली गावात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेले फटाके जप्त

Govind Barge case: सोन्याचे दागिने, प्लॉट, बुलेट ते शेतजमीन... तरी तिची भूक भागली नाही, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची

पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

जंगल सफारीचे विशेष आकर्षण पुणे : पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहास्तव पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही

‘महादेवी’च्या अनुपस्थितीतच नांदणी मठात नवरात्रोत्सव साजरा होणार ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय

हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय