दर घसरल्याने दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

दर घसरल्याने दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!


बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त


मुंबई  :खजूर, बदाम, पिस्ता हे खाणे श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. सुकामेव्याच्या वाढत्या दरामुळे गोरगरीबांना दिवाळी दसरा सणाच्या कालावधीत खरेदी करणे त्यांना अवघड जात होते. केंद्र सरकारने जीएसटीत केलेल्या बदलामुळे सुकामेव्याची खरेदी आता सर्वांच्या आवाक्यात येणार आहे.


नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो.


आयात केली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत खजुरांच्या भावात २५ टक्के घट झाली आहे. यंदा मात्र केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला आहे. यामुळे सामन्यांकडून मागणी वाढणार असून हे दर दसरा, दिवाळीमध्येही असेच राहणार असून सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. - नवीन गोयल, ड्रायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चंट चेंबर सदस्य


सुकामेव्यातील दरात घट झाल्याने विक्रीत वाढ होऊन दिवाळी दसऱ्यामध्ये गिफ्ट देण्याच्या बॉक्समध्ये सुकामेव्याच्या उलाढालीला गती मिळेल. दिवाळीमध्ये घरी येणाऱ्या पाहूण्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंमध्ये सुकामेव्याच्या पॅकिंग विक्रीतील उलाढाल वाढून मार्केटमधील अर्थकारणात बदल झालेला पाहावयास मिळेल. - अमर चौधरी, नवदुर्गा सुपर मार्केट



आजपासून मार्केटमध्ये असे होणार दर (प्रतिकिलो, रुपयांतील दर)

प्रकार - आताचे दर - जीएसटी कमी केल्यानंतरचे दर

खजूर - ३३६ - ३१५

बदाम - ८९६ - ८४०

पिस्ता  -  १२५० - ११५०

आक्रोड - १२५० - ११५०

अंजीर - १५०० - १३००

खारीक - २८० - २५०

जर्दाळू - ५०० - ४००
Comments
Add Comment

म्हाडाच्या घरांचे दर १० टक्क्यांनी कमी होणार

म्हाडाच्या घरांचे दर १० टक्क्यांनी कमी होणार म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर होताच, त्याच्या किंमती जास्त

GST: आजपासून तुमचे किती पैसै वाचणार? दररोज लागणाऱ्या या वस्तू झाल्या स्वस्त...

मुंबई: आजपासून देशभरात अनेक दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन

Navratri 2025 : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ,जाणून घ्या नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व

मुंबई: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। अर्थ : सर्व

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती - मुख्यमंत्री

मुंबई : देशात उद्या, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याचे वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा