कोणत्या उत्पादनांच्या किमती कमी झाल्या?
जीएसटी दरांमध्ये कपात झाल्यामुळे अमूलने अनेक उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने तूप, बटर, चीज, पनीर, आईस्क्रीम, यूएचटी दूध, चॉकलेट्स, बेकरी उत्पादने, फ्रोझन स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क आणि पीनट स्प्रेड यांचा समावेश आहे.
किती रुपयांची कपात?
उत्पादनानुसार दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
बटर (100 ग्रॅम) - ₹62 वरून ₹58 🧈
तूप - प्रति लिटर ₹40 नी कमी होऊन ₹610
अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक (1 किलो) - ₹30 नी कमी होऊन ₹545
फ्रोझन पनीर (200 ग्रॅम) - ₹99 वरून ₹95 🧀
अमूलने स्पष्ट केले आहे की, पाऊचमध्ये मिळणाऱ्या दुधाच्या (pouch milk) किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही, कारण त्यावर आधीपासूनच शून्य टक्के जीएसटी आहे. कंपनीचा विश्वास आहे की या किंमत कपातीमुळे देशात दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढेल.