रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग (सेंट्रल रेल्वे मेन लाईन)
स्थानक - ठाणे ते कल्याण
मार्ग - जाणारा आणि येणारा जलद मार्ग
वेळ - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
परिणाम - ब्लॉक वेळेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे
स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : जाणाऱ्या आणि येणाऱ्या
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेलदरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान लोकल उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे
स्थानक : वसई रोड ते विरार
मार्ग : जाणारा आणि येणारा धीमा मार्ग
वेळ : रविवारी १२.१५ ते पहाटे ४.१५
परिणाम : ब्लॉकवेळेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आज राज्यभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलन

मेट्रो-३ संपूर्ण मार्गिकेसाठी तिकीट दर निश्चित

मेट्रो-३ संपूर्ण मार्गिकेसाठी तिकीट दर निश्चित मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी मुंबई (प्रतिनिधी): अॅप आधारित

खड्ड्यांमुळे राज्यात आतापर्यंत १२ मृत्यू

खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरा : उच्च न्यायालय मुंबई (प्रतिनिधी): रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट