Zubin Garg Death: गायक झुबीन गर्गचे अपघाती निधन की हत्या? व्यवस्थापक आणि आयोजकावर गुन्हा दाखल

गुवाहाटी: 'या अली', 'जाणे क्या होगा रामा रे', 'दिलरुबा' सारखे बॉलीवूड मधील सुपरहिट गाणी देणारा सुप्रसिद्ध पार्श्वगायक झुबीन गर्गच्या आकस्मिक निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचे ज्याप्रकारे निधन झाले, ते पाहता आसाममधील लोकांमध्ये दुःख आणि संतापाची लाट उसळली आहे. सिंगापूरमध्ये गाण्याचे सादरीकरण करायला गेलेल्या झुबीनचा स्कुबा डायव्हिंग दरम्यान झालेल्या मृत्यूमागे दुसरे काही कारण तर नाही ना? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याच्या मृत्यूनंतर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी झुबिनच्या मृत्यूबाबत महत्त्वपूर्ण कारवाईचे आदेश दिले आहेत.


मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर झुबीनचे व्यवस्थापक आणि सिंगापूर येथील कार्यक्रम संयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच सोशल मिडियावर देखील झुबीनचे मृत्यूपूर्वीचे काही व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. ज्यामुळे,  आसामच्या या सुपरस्टार सिंगरच्या मृत्यूचे गूढ आणखीन वाढले आहे.



झुबिनच्या मृत्यूनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे पाऊल


झुबिन गर्गच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबासोबत बॉलीवूड सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसेच संपूर्ण आसाममध्ये शोककळा पसरली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा स्वतः झुबिनच्या मृत्यूने दुःखी आहेत. दरम्यान, त्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी झुबिनच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी X (पूर्वी ट्विटर) वर ट्विट करत म्हंटले, "आमच्या प्रिय झुबिन गर्ग यांच्या दुर्दैवी आणि अकाली निधनासंदर्भात श्यामकानु महंता आणि सिद्धार्थ सरमा यांच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मी आसाम पोलिसांच्या डीजीपींना सर्व एफआयआर सीआयडीकडे हस्तांतरित करण्याचे आणि सखोल चौकशीसाठी संयुक्त गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत."


श्यामकानु महंत हे सिंगापूरमधील झुबीनच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, जिथे झुबिनचे सादरीकरण होणार होते. तर झुबीनचा व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आहे, जो त्याचे सर्व कार्यक्रम आणि व्यावसायिक व्यवहार सांभाळत होता.



झुबिनला परदेशात मारण्याचा कट रचल्याचा आरोप


दोघांविरुद्ध पहिला एफआयआर आसाममधील मोरीगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की त्यांनी गायनाच्या बहाण्याने झुबिनला परदेशात नेण्याचा कट रचला होता, परंतु त्यांचा हेतू त्याला मारण्याचा होता. झुबिनला लाईफ जॅकेटशिवाय पाण्यात उडी मारण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर निष्काळजीपणाचाही आरोप होत आहे.



जुबिनचा अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार?


झुबिन गर्गचा अंत्यसंस्कार २१ सप्टेंबर रोजी आसाममध्ये होईल. आज दिनांक २० सप्टेंबर रोजी सिंगापूरहून दिल्लीला त्याचे पार्थिव आणले जाणार आहे, यादरम्यान आसामचे मुख्यमंत्री दिल्लीत हजर राहणार असून,  दुसऱ्या दिवशी मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवला जाईल. त्यानंतर, झुबिनचा पार्थिव गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियममध्ये जनतेसाठी ठेवण्यात येईल, जिथे त्याचे चाहते येऊन गायकाला अंतिम श्रद्धांजली वाहतील.

Comments
Add Comment

"लवकर तोडगा निघेल अशी आशा..." ट्रम्पच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीवर भारताची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्जांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने पहिली

आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करणारा पहिला तरुण

नवी दिल्ली : मुंबईमध्ये राहणाऱ्या अंकुश गोयल याने भारतातील पहिला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा मान मिळवला

दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने

झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक

रेल्वे प्रवाशांना आता १४ रुपयांना मिळेल एक लिटर 'रेल नीर'

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे बोर्डाने बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या 'रेल नीर' आणि इतर शॉर्टलिस्टेड ब्रँड्सची

मुस्लिम कायद्याचा गैरवापर; इतकी लग्नं का करता?

केरळ उच्च न्यायालयाची मुस्लिम पुरुषावर कठोर टिप्पणी तिरुवनंतपुरम: पत्नीचा योग्यप्रकारे सांभाळ करू शकत