Jammu And Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये पाकिस्तानी ड्रोन; भारतीय सैन्याकडून गोळीबार होताच पळाले

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढू लागल्या आहेत. एकीकडे अफगाणिस्तान विरोधाच्या युद्धात पाकिस्तानचं मोठं नुकसान होत आहे. असं असतानाही पाकिस्तान भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन पाठवण्याची हिंमत करत आहे. या घटना सातत्याने समोर येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा पार करुन एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत होता. पण भारतीस सैन्याच्या निदर्शनास येताच सैन्याने त्या ड्रोनच्या दिशेला गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे ते ड्रोन परत पाकिस्तानच्या दिशेला पळून गेले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. ड्रोन दिगवार परिसरात काही क्षण घिरट्या मारत होते. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेला परतले.


सीमेवर तैनात असलेल्या एका सैनिकाने रविवारी पहाटे ६ वाजून १० मिनिटाच्या सुमारास पाकिस्तानचे ड्रोन पाहिले. त्यानंतर ते पाडण्यासाठी त्याच्या दिशेला गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनने पहाटे पावणे सहा ते सहा वाजेच्या सुमारास भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या ड्रोनवर गोळीबार केल्यानंतर ड्रोन तातडीने पाकिस्तानच्या दिशेला परत गेले.


या ड्रोनच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन केलं जात आहे. ड्रोनमधून कुठलं शस्त्र किंवा काही अंमली पदार्थ एअरड्रॉप तर केले गेले नाहीत ना, याबाबत शोध घेतला जात आहे. याआधी २७ फेब्रुवारीला देखील भारतीय लष्कराच्या जवानाने भारताच्या हवाई हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी ड्रोनच्या दिशेला गोळीबार केला होता.



महिन्याभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली



विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अशाच प्रकारे पाकिस्तानी ड्रोन घिरट्या मारताना दिसले होते. सुरक्षा एजन्सीजने देखील ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच ड्रोन दिसल्यानंतर BSF च्या जवानांनी त्या ड्रोनवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर तातडीने परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसेच सर्च ऑपरेशन जारी करण्यात आले होते.


विशेष म्हणजे अशाप्रकारे पाकिस्तानच्या ड्रोनच्या घुसखोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीदेखील कठुआ जिल्ह्यात ड्रोन घिरट्या मारताना दिसल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यादिवशी तब्बल पाच मिनिटांपर्यंत ड्रोन भारताच्या हवाई हद्दीत बघायला मिळालं होतं. त्यामुळे सुरक्षा दल तातडीने अलर्ट झाले होते. पण तरीही सीमाभागात सातत्याने पाकिस्तानच्या कुरापती बघायला मिळत आहेत.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला