दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करत सांगितले की, तिच्या पतीचा मित्र अनीस सिद्दीकीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा गैरवापर करून तिचे अश्लील फोटो आणि व्हीडिओ तयार केले. त्यांचा आधार घेत ब्लॅकमेल केले आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेमध्ये आरोपीसोबत त्याची आई आणि बहीणही सहभागी असल्याचा दावा पीडितेने केला आहे. ३० वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासोबत लाहोरी गेट परिसरात राहते. तिचा पती सुकामेव्याचा व्यवसाय करतो.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनीसने तिच्यासोबत काढलेला फोटो घेतला आणि त्याचा वापर करून आक्षेपार्ह एआय फोटो आणि व्हीडिओ तयार केले. यावर्षी जून महिन्यात, जेव्हा तिचा पती घरी नव्हता, तेव्हा अनीसने पीडितेला हे फोटो दाखवून धमकी दिली की ते व्हायरल करून तिचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करेन. त्याने घटस्फोटाचा धाक दाखवला आणि तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात आले.


सततच्या धमक्यांमुळे आणि भीतीपोटी तिने आरोपीला पाच लाख रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. मात्र इतक्यावरही अनीस थांबला नाही. सप्टेंबर महिन्यात त्याने पुन्हा तिचे एआय बनवलेले व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.


पीडितेच्या पतीला तिचे आक्षेपार्ह फोटो मिळाल्यानंतर त्याने चौकशी केली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या पतीच्या मदतीने तिने धैर्य गोळा करून पोलिसांत एफआयआर दाखल केला. सध्या या प्रकरणाचा तपास एसआय अवंती राणी यांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. अद्याप आरोपी व त्याच्या कुटुंबातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा