PM Narendra Modi Birthday : ना हॅक, ना ट्रॅक! ही आहे PM मोदींच्या फेव्हरेट फोनची खासियत

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्याबद्दल नवीन माहिती मिळवण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. आज, १७ सप्टेंबरला ते आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदीजींच्या कामकाजाची पद्धत, त्यांचे निर्णय, त्यांचा दैनंदिन दिनक्रम याबद्दल आपण अनेकदा ऐकतो. पण एक प्रश्न अनेकांना पडतो – “पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन वापरतात?” सामान्य लोक जसे स्मार्टफोन्स वापरतात तसे फोन पंतप्रधानांसाठी सुरक्षित नसतात. कारण त्यांच्या प्रत्येक संभाषणात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती असते. त्यामुळे त्यांना असा फोन आवश्यक असतो, ज्यात उच्चस्तरीय सिक्युरिटी सिस्टीम असते. एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटवरील एका ब्लॉगनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे RAX Phone वापरतात. हा फोन खासकरून सरकारी अधिकाऱ्यांसाठी डिझाईन करण्यात आला असून, त्याचा मुख्य उद्देश सिक्योर कम्युनिकेशन पुरवणे हा आहे. RAX Phone च्या अत्याधुनिक एनक्रिप्शन तंत्रज्ञानामुळे हॅकिंग, कॉल टॅपिंग किंवा डेटा लीक होण्याचा धोका जवळपास संपुष्टात येतो. म्हणूनच मोदीजींच्या फोनचा उल्लेख केवळ गॅझेट म्हणून नाही, तर देशाच्या सुरक्षेचा एक मजबूत कवच म्हणून केला जातो.



कोणी बनवला हा फोन?


RAX Phone हा साधा स्मार्टफोन नाही, तर एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षित डिव्हाइस आहे. या फोनची निर्मिती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT) या सरकारी संस्थेने केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे संभाषण नेहमीच गोपनीय आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे हा फोन विशेष डिझाईन करण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये एडव्हान्स सिक्युरिटी फीचर्स तसेच एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सिस्टम उपलब्ध आहे. म्हणजेच या फोनद्वारे केलेली प्रत्येक कॉल, मेसेज किंवा डेटाची देवाणघेवाण ही तीन स्तरांच्या एन्क्रिप्शनमुळे पूर्णपणे सुरक्षित राहते. यातील मल्टीलियर सिक्युरिटी लेयर्स इतके मजबूत आहेत की त्यांना तोडणे किंवा हॅक करणे जवळपास अशक्य आहे. याशिवाय हा फोन मिलिटरी फ्रीक्वेन्सी बँड्सवर कार्यरत असल्यामुळे त्याला ट्रॅक करणे किंवा इंटरसेप्ट करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा केवळ संवादासाठीचा मोबाईल नसून, तो देशाच्या सुरक्षेसाठी एक अभेद्य कवच आहे.



ही आहे फोनची खासियत



  • फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन : हा फोन चालवण्यासाठी फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन अनिवार्य आहे. म्हणजेच फक्त अधिकृत (ऑथोराइज्ड) व्यक्तीलाच या फोनचा वापर करता येतो.

  • लाइव्ह पिक्चर व्हेरिफिकेशन : कॉल दरम्यान समोरील व्यक्तीचा लाइव्ह फोटो स्क्रीनवर दिसतो, ज्यामुळे ओळख पटवणं सोपं होतं आणि फसवणुकीचा धोका कमी होतो.

  • हँडसेट लेव्हल एन्क्रिप्शन : या फोनमध्ये संभाषण हँडसेट स्तरावरच एन्क्रिप्ट केलं जातं. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कॉल टॅप किंवा फोन ट्रॅक करणं जवळपास अशक्य आहे.

  • सरकारी स्तरावरील सुरक्षा : RAX Phone वर NTRO (National Technical Research Organisation) आणि DEITY (Department of Electronics and IT) सारख्या प्रमुख सुरक्षा यंत्रणांकडून लक्ष ठेवले जाते.

  • किंमत गुप्त : या फोनची किंमत सामान्य बाजारात उपलब्ध नाही. कारण तो विशेषतः सरकारी अधिकारी आणि संवेदनशील पदांवरील व्यक्तींसाठी डिझाईन करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन