सेवा बंद असताना मोनोरेलची सिस्टिम अपग्रेड केली जाईल. नवीन रोलिंग स्टॉकचे जलद एकत्रीकरण, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग अपग्रेड आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा मोनोरेलमधील प्रवास आणखी सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे. अत्याधुनिक सिग्नलिंग सिस्टम, हैदराबादमध्ये विकसित केलेली अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टम (सीबीटीसी) मोनोरेलमध्ये बसविली जाईल.
आधुनिकीकरणाचे काम केल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा तपासण्या केल्या जातील. यानंतर मोनोरेल पुन्हा कधी सुरू करायची याचा निर्णय तंत्रज्ञांच्या सल्ल्याने घेतला जाईल. एमएमआरडीए प्रसिद्धीपत्रक काढून मोनोरेल कधी सुरू करणार याची माहिती योग्य वेळी देईल.
एमएमआरडीएने २४६० कोटी रुपये खर्च करून उभारलेली २० किमी लांबीची चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल सेवा तोट्यात आहे. प्रवाशांचा अपुरा प्रतिसाद, गाड्यांचे वारंवार होणारे अपघात आणि तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल पुढील समस्या वाढत आहेत.
१९ ऑगस्ट २०२५ - म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल बंद, अडकलेल्या प्रवाशांची अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका, सेवा काही तास ठप्प
२१ ऑगस्ट २०२५ - तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटांसाठी मोनोरेल बंद
१५ सप्टेंबर २०२५ - वडाळ्याजवळ एका मार्गावरील मोनोरेल काही काळ बंद