९०० कोटींचा Saatvik Green Energy IPO १९ सप्टेंबरपासून गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार

मोहित सोमण: सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड (Saatvik Green Energy Limited) कंपनीचा आयपीओ १९ सप्टेंबरपासून बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओसाठी कंपनीकडून प्राईज बँड ४४२ ते ४६५ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. ९०० कोटी मूल्यांकन असलेला हा आयपीओ १९ ते २३ सप्टेंबर कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. आयपीओपूर्वी एक दिवस आधी म्हणजेच १८ सप्टेंबरला कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून निधी उभारेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओत ७०० कोटी रूपयांचा फ्रेश इशू (Fresh Issue) असणार असून उर्वरित २०० कोटी मूल्यांकनाचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध असतील.गुंतवणूकदार या आयपीओसाठी १८ सप्टेंबरपासून बोली (Bi dding) लावू शकतात. या आयपीओत गुंतवणूकीसाठी सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) किमान ३२ शेअरची खरेदी करू शकतात. ३२ शेअर म्हणजेच किमान १४८८० रुपयांची गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांना अनिवार्य असेल. DAM Capital Advisors Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांना समभा गाचे वाटप (Allotment) २४ सप्टेंबरला होईल व कंपनी बीएसई (BSE) व एनएसईत (NSE) २६ सप्टेंबरला सूचीबद्ध (Listed) होणार आहे.


कंपनीच्या एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB) यांच्यासाठी ५०% वाटा,किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors ) ३५% वाटा, व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ( Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५% वाटा उपलब्ध असणार आहे. तर दोन लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही सवलत मिळणार आहे.निलेश गर्ग, मानिक गर्ग, मानविका गर्ग व एसपीजी ट्रस्टी हे कंपनीचे प्रवर्तक (Prom oter) आहेत. २०१५ साली कंपनीची स्थापना झाली होती. ही कंपनी प्रामुख्याने स्वच्छ हरित ऊर्जा (Green Energy) व सौरऊर्जा (Solar Energy) क्षेत्रात कार्यरत आहे. सातविक ग्रीन एनर्जी लिमिटेड ही मॉड्यूल्सची उत्पादक आहे आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) ऑफर करते.


कंपनी सध्या अशा तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या सौर मॉड्यूल उत्पादनांचा एक व्यापक पोर्टफोलिओ ऑफर करते जे ऊर्जा नुकसान कमी करण्यास आणि एकूण कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात. गेल्या काही वर्षांत वार्षिक स्थापित क्षमता ३१ मार्च २०१७ रोजी १२५ मेगावॅटवरून ३० जून २०२५ पर्यंत सुमारे ३.८० गिगावॅटपर्यंत वाढवली आहे असे कंपनीच्या माहितीत म्हटले आहे.


माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १००% वाढ झाली आहे. तर करोत्तर नफा (Profit after tax PAT) ११३% वाढ झाली होती.


कंपनी अंबाला हरियाणा येथे दोन मॉड्यूल उत्पादन सुविधा चालवते. कंपनीचा प्रकल्प एकूण ७२४,२२५ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला आहे. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५९१०.१९ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी थकबाकी चुकवण्यासाठी, काही प्रमाणात आगाऊ (Advance) रक्कम भरण्यासाठी, कंपनीचीच सह कंपनी (Subsidiary) असलेल्या Saatvik Solar Industries Limited मध्ये गुंतवणूक करण्यासा ठी तसेच नवीन प्रकल्प उभारण्यासाठी करणार आहे असे कंपनीने म्हटले आहे. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल (Stake) ९०.०५% आहे जे आयपीओनंतर काही प्रमाणात कमी होणार आहे.

Comments
Add Comment

Stocks to Sell Today: आज खरेदीऐवजी 'हे' ३ शेअर लवकरात लवकर विकण्याचा जेएम फायनांशियल कंपनीचा सल्ला

प्रतिनिधी: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज सर्विसेसकडून तीन शेअर विकण्याचा 'सेल कॉल' आलेला आहे. हे

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

IPO Update: आजपासून गॅलार्ड स्टील लिमिटेड व एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज आयपीओ बाजारात १२ वाजेपर्यंत 'इतके' सबस्क्रिप्शन हे आयपीओ खरच सबस्क्राईब करावा का? जाणून घ्या

मोहित सोमण: आजपासून गॅलार्ड स्टील लिमिटेड (Gallard Steel Limited) व एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Excelsoft technologies Limited) या दोन

मोठी बातमी: एमएसएमई आणि स्टार्टअप कर्ज वितरणासाठी सिडबी आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

मुंबई: लघुउद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन वित्तपुरवठा करून अर्थसहाय्य करणाऱ्या स्मॉल

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

१४० कोटी भारतीयांसाठी युट्यूबची मोठी घोषणा आता व्यवसायिक शिक्षण युट्यूबवर शक्य

प्रतिनिधी: लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूबचा वापर होतो. टीव्हीपेक्षा