EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. अनेकदा कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यास विसरतात. अशा प्रलंबित रक्कमेसाठी आता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, ज्या खात्यांमध्ये एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, ती रक्कम सरकार स्वतःहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची किंवा अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. तुमचे पीएफ पैसे थेट तुमच्या व्हेरिफाईड बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. तसेच, ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन तो आता केवळ ३ दिवसांवर आला आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, ज्या पीएफ खात्यात सलग ४६ महिने (३ वर्षे) कोणताही नवा हिस्सा जमा होत नाही, ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते.


ईपीएफओकडे सध्या अशा ३१.८६ लाख खात्यांमध्ये एकूण १०,९०३ कोटी रुपये पडून आहेत. पहिल्या टप्प्यात १,००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली ७.११ लाख खाती निवडण्यात आली असून, त्यातील ३०.५२ कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांना परत दिले जाणार आहेत. अनेकजण छोटी रक्कम असल्याने पीएफ काढण्याचा कंटाळा करतात, यामुळे हजारो कोटी रुपये ईपीएफओकडे पडून आहेत. आता सरकारने हे पैसे थेट खातेदारांना देण्याचे अभियान हाती घेतले आहे.


इतकेच नाही, तर आता पीएफ क्लेम अवघ्या ७२ तासांत (३ दिवसांत) सेटल होणार आहे. यामुळे तातडीच्या वेळी पैशांची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने अशा ७.११ लाख खात्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये १००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. या मोहिमेमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचे पैसे विनासायास परत येणार आहेत. जर तुमचे खाते ३ वर्षांपासून बंद असेल, तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला