Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री विंग गावातून अटक केली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.


या प्रकरणात यापूर्वीच त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह एकूण सुमारे ५० जणांविरोधात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले. सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पाच अधिकारी आणि संबंधित नातेवाईक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण न घेता कर्जवाटप केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नव्याने कर्जखाती उघडणे, निधीचा उद्देशबाह्य वापर करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि खोट्या नोंदी करून ठेवीदार व सभासदांच्या हिताला बाधा पोहोचवणे, असे गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहेत.


९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, ३१६ (२), ३१६(४), ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३३९, ३४० (२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित कलमे अजामीनपात्र असल्याने आरोपींवर अटकेची कारवाई सुरू आहे.


दरम्यान, या प्रकरणात प्रवर्तन संचालनालय (ईडी) कडूनही कारवाई करण्यात आली असून, चरेगावकर यांच्या बंगल्यावर तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला वेग आला असून, या घोटाळ्यात आणखी कोणती नावे समोर येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील या प्रचंड आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस