सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको चाचण्यांचे नेतृत्व केले. सोलापूर विभागातील ढवळस आणि भालवणी स्थानकांदरम्यान २६ किमी अंतरावर केलेली ही पहिली ‘कवच’ चाचणी आहे. यावेळी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता मनिंदर सिंग उप्पल, सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा आणि मुख्यालय आणि सोलापूर विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील चाचणी दरम्यान उपस्थित होते.


लोको चाचण्यांदरम्यान, कवच प्रणालीच्या महत्त्वपूर्ण सुरक्षा वैशिष्ट्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये स्टॉप सिग्नलवर SPAD (सिग्नल पास अॅट डेंजर) चाचणी, ब्लॉक सेक्शन SOS (इमर्जन्सी) जनरेशन, स्टेशन मास्टर SOS (इमर्जन्सी) जनरेशन, टर्नआउट्सवर ओव्हरस्पीड प्रतिबंध चाचण्या घेण्यात आल्या.


यावेळी श्री धर्मवीर मीणा म्हणाले की “सोलापूर विभागात कवचची यशस्वी चाचणी ही या स्वदेशी सुरक्षा प्रणालीच्या अमलबजावणीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता यांच्या सर्वोच्च पातळीची खात्री करण्यावर भारतीय रेल्वेचे अढळ लक्ष प्रतिबिंबित करते.” मध्य रेल्वेमध्ये कवचच्या अमलबजावणीसाठीची निविदा ३० मार्च २०२५ रोजी देण्यात आली आणि सोलापूर विभागात ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत लोको चाचण्या यशस्वीपणे पार पाडणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत