दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. दिवाळी सणानिमित्त सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवासी गर्दीत वाढ होत असते. दिवाळीमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ व विशेषतः महिला प्रवासी वर्ग लक्षात घेता नियमित बससेवा व्यतिरिक्त ज्यादा बसमार्गांचे नियोजन महामंडळाने केले आहे.


यंदा १५ ऑक्टोबरपासून दिवाळी हंगाम सुरु होणार असून परतीचा प्रवास २४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे व ५ नोव्हेंबरपर्यत हा हंगाम सुरु असणार आहे. तसेच राज्यातील सर्व ठिकाणांहून या जादा बसगाड्या सोडण्यात येणार असून या सर्व बसगाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले असून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ज्यादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व नियमित व जादा बसगाड्यांना सर्व प्रकारच्या सवलती लागू राहण्यात येणार आहेत.


एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन :




  • परळ आगार : ( ४. १५ सोनसळ) ( ५. ४५ मुखेड ) ( २३. ४५ नारायणगाव )

  • कुर्ला नेहरू नगर : (५. ३० घोडेगांव) (२२. ०० कराड )

  • पनवेल : (६. ३० वाशी - कराड ) (०८. ०० वाशी - नरसोबा वाडी ) (०८. ३० वाशी - छ संभाजी नगर )

  • मुंबई सेंट्रल : (१७. ०० कराड ) (०८. ०० कोल्हापूर )

  • बोरिवली : (०६. ४५ मंचर ) (०७. ०० चिखली)

  • ठाणे : (०८. ०० वाशीम ) ( ५. ३० खरसुंडी ) (०५. ४५ सातारा ) (०६. ३० सातारा) (०७. ४५ शिर्डी) (०८. ०० नारायणगाव)


प्रवाशांवर पडणार भाडेवाडीचा बोजा


हंगामी लागू होणारी दहा टक्क्यांची दरवाढ यंदाही लागू होणार असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले. मात्र हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असून त्यावर निर्णय झाल्यावर ही दहा टक्के दरवाढ लागू होणार असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.