
मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. दिवाळी सणानिमित्त सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवासी गर्दीत वाढ होत असते. दिवाळीमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ व विशेषतः महिला प्रवासी वर्ग लक्षात घेता नियमित बससेवा व्यतिरिक्त ज्यादा बसमार्गांचे नियोजन महामंडळाने केले आहे.
यंदा १५ ऑक्टोबरपासून दिवाळी हंगाम सुरु होणार असून परतीचा प्रवास २४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे व ५ नोव्हेंबरपर्यत हा हंगाम सुरु असणार आहे. तसेच राज्यातील सर्व ठिकाणांहून या जादा बसगाड्या सोडण्यात येणार असून या सर्व बसगाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले असून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ज्यादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व नियमित व जादा बसगाड्यांना सर्व प्रकारच्या सवलती लागू राहण्यात येणार आहेत.
एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन :
- परळ आगार : ( ४. १५ सोनसळ) ( ५. ४५ मुखेड ) ( २३. ४५ नारायणगाव )
- कुर्ला नेहरू नगर : (५. ३० घोडेगांव) (२२. ०० कराड )
- पनवेल : (६. ३० वाशी - कराड ) (०८. ०० वाशी - नरसोबा वाडी ) (०८. ३० वाशी - छ संभाजी नगर )
- मुंबई सेंट्रल : (१७. ०० कराड ) (०८. ०० कोल्हापूर )
- बोरिवली : (०६. ४५ मंचर ) (०७. ०० चिखली)
- ठाणे : (०८. ०० वाशीम ) ( ५. ३० खरसुंडी ) (०५. ४५ सातारा ) (०६. ३० सातारा) (०७. ४५ शिर्डी) (०८. ०० नारायणगाव)
प्रवाशांवर पडणार भाडेवाडीचा बोजा
हंगामी लागू होणारी दहा टक्क्यांची दरवाढ यंदाही लागू होणार असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले. मात्र हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असून त्यावर निर्णय झाल्यावर ही दहा टक्के दरवाढ लागू होणार असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले.