‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल


गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करत आहे. 'ऑपरेशन सिंदूर' वेळी काँग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी होते, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममध्ये १९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.'


पीएम मोदी पुढे म्हणतात, 'जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या पाठीशी उभी होती. पाकिस्तानचे खोटे बोलणे काँग्रेसचा अजेंडा बनले. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी नियोजनबद्ध पद्धतीने घुसखोरीस प्राधान्य दिले. आसाम सरकारने लाखो एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केली,' असा दावाही त्यांनी केला


यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर आसामच्या महान कलाकार भूपेन हजारिका यांचा अपमान केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस अध्यक्षांनी भारतरत्न पुरस्काराची खिल्ली उडवत म्हटले होते की, मोदी नर्तक आणि गायकांना भारतरत्न देत आहेत. काँग्रेसने आसामच्या सुपुत्राचा अपमान केला, ही अतिशय दुखावणारी बाब आहे.


काँग्रेस अहंकाराने भरलेली आहे. आसामच्या लोकांनी, देशातील लोकांनी भूपेन दा यांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसला जाब विचारला पाहिजे. आसामच्या सांस्कृतिक वारशाचा आदर, आसामचा जलद विकास ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे.'



स्वदेशीला प्राधान्य द्या...


स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले, 'तुम्ही जे काही खरेदी कराल, ते स्वदेशीच खरेदी करा. तुम्ही एखाद्याला भेटवस्तू दिली, तर ती मेड इन इंडिया असावी. त्यात भारतीय मातीचा सुगंध असावा. कंपनी कोणत्याही देशाची असो, ती वस्तू भारतात बनवलेली असली पाहिजे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटीचे दर कमी केले जातील. आरोग्य, विमा, सर्व काही स्वस्त होईल. जीएसटीच्या निर्णयामुळे सणांमध्ये चमक वाढेल,' असेही ते यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना सकाळी ९ वाजेपासून

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

दिल्ली स्फोटाच्या तपासाचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे नेतृत्व

नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)

बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण,

दिल्ली स्फोट तपासात मोठे यश! ड्रायव्हर डॉ. उमर नबी असल्याचे डीएनए तपासातून स्पष्ट

नवी दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामधील तपासात मोठे यश मिळाले आहे. या भीषण