कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्त


सोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाबत शहरातील एका दुकानदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायासह भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडावा, अशी अचंबित करणारी आणि चिड निर्माण करणारी विचित्र मागणी त्याने केली आहे. कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत रा.पा.कटेकर नावाच्या दुकानदाराने हे वादग्रस्त वक्तव्य केले.

वारकरी संप्रदायाच्या भावनेला व विठ्ठल मंदिराला हात घातल्याने सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः यासाठी आग्रही आहेत. कॉरिडॉरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि रहिवासांशी अनेक वेळा बैठका घेतल्या. शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगितली. तरीही येथील या दुकानदाराने अशी बेताल वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी