बर्गे यांच्या मृत्यूप्रकरणातली नर्तिका पूजा गायकवाड हिचं नाव सातत्याने समोर येत असून तिच्या प्रेमात अखंड वेडा झालेल्या बर्गे यांनी तिच्यामुळेच आपले आयुष्य संपवलं असल्याचे काहीचं म्हणणं आहे. या आत्महत्येनंतर पूजा गायकवाड बरीच चर्चेत असून सोशल मीडियावरही तिच्या नावाची खूप चर्चा सुरू आहे. पूजा गायकवाड कोण आहे? हे पाहण्यासाठी लोकं तिच्या सोशल मिडियावर अकाऊंटवर गर्दी करताना पहायला मिळत आहे.
कोण आहे पूजा गायकवाड?
नर्तिका असलेल्या पूजाचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून, त्यावर ती तिचे रील्स टाकत असते. विशेष बाब म्हणजे, ही घटना घडण्यापूर्वी म्हणजेच केवळ २ दिवस आधी पूजाचे फॉलोअर्स अवघे ५००-७०० इतकेच होते. मात्र गोविंद बर्गे मृत्यूप्रकरण समोर आल्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दि. १२ सप्टेंबरपर्यंत तिचे एकूण ३१ हजार फॉलोअर्स झाले आहेत. ज्यात काही दिवसांत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.