Mumbai Nasik Highway Accident: देवदर्शनानंतर घरी परतणाऱ्या बाप लेकीवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात


ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी येथील डोहळे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गनजीक असलेलल्या साईधाम लॉजिस्टिकसमोर घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश अधिकारी (वय ३९) व त्यांची मुलगी वेदिका अधिकारी (वय ११) यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही भिवंडी तालुक्यातील सापे गावातील नातेवाईकांकडे देवदर्शनासाठी आले होते व घरी परतत असताना हा अपघात घडला.

या अपघातामुळे शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात गणेशोत्सवाच्या काळात शोककळा पसरली आहे. मृतदेह पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले असून, या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करत आहेत.

 
Comments
Add Comment

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात

पाण्याचा काटकसरीने वापर करा : ठामपाचे आवाहन ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे पिसे, पांजरापूर येथील

ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले

ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या

डिझाइन इंजिनीअर बनली मेट्रो पायलट

मुरबाड (वार्ताहर) : मेट्रो रेल्वेने दळणवळणाचा चेहरामोहरा बदलला आहे आणि या आधुनिक प्रवासाचे नेतृत्व आता एका

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या