सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अखेर व्हायरल झालेल्या वादग्रस्त व्हिडिओवर बोलले आहेत. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावातील आहे. गावातील काही व्यक्तींनी बेकायदा मुरुम उपसा थांबवण्यासाठी थेट अजित पवारांना फोन केला होता. त्यावेळी पवारांनी तिथे कारवाई करणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना थेट फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी "आपकी इतनी डेरिंग" अशा शब्दांत बोलून दादागिरीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. विशेषतः महिला अधिकाऱ्याचा अवमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आता मात्र अजित पवारांनी स्वतः या संपूर्ण घटनेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी ट्विट करुन अजित पवारांना लक्ष्य केलं होतं, तर खासदार संजय राऊतांनी अजित पवारांची शिस्त आता कुठ गेली, असा सवाल उपस्थित केला होता. अखेर, सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, माझा हेतू कधीही कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा आणण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती अधिक तणावपूर्ण होऊ नये याची काळजी घेण्याचा होता. पोलीस दलाबद्दल आणि विशेषत: निष्ठेने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सदैव सर्वोच्च आदर आहे, असेही ते म्हणाले. कायद्याचे राज्य हे माझ्यासाठी सर्वोच्च असून पारदर्शक प्रशासन चालवणे हेच ध्येय आहे, अशी खात्री पवारांनी दिली. तसेच, बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपसा किंवा कोणतीही बेकायदेशीर कृती झाल्यास त्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्याबाबत मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावरून विरोधकांनी सोशल मीडियावरून टीका करत पवारांना लक्ष्य केले होते. खासदार संजय राऊत यांनी तर "अजित पवारांची शिस्त कुठ गेली?" असा सवाल उपस्थित केला होता. वाढत्या टीकेमुळे अखेर अजित पवारांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आपली भूमिका उघडपणे मांडली.
मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईत उद्या (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ...
नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात मुरुम उचलण्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि तो अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. सुरुवातीला त्यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. फोनवर अजित पवार दोनदा सांगताना दिसले की, “डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ… ये कार्यवाही बंद करो, मेरा आदेश है.” त्यावर अंजली कृष्णा यांनी उत्तर दिले- “मेरे फोन पर कॉल करें.” हे ऐकून पवार रागावले आणि म्हणाले, “तुम पर ॲक्शन लूंगा… इतनी डेरिंग है तुम्हारी? मेरा चेहरा तो पहचानोगी ना?” त्यानंतर त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोठी चर्चा रंगली. घटनेनंतर विरोधकांनी पवारांवर टीका केली, तर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन महिला अधिकाऱ्याचा सन्मान राखला असल्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचाच उद्देश असल्याचे सांगितले.