भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून राज्यभारत अनेक ठिकाणी  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या दरम्यान धार्मिक कार्यक्रमाला येणाऱ्या लोकाना भंडाऱ्याचे आमंत्रण देखील दिले जाते. मात्र अशाच एका भंडाऱ्याच्या कार्यक्रमात जेवण करणं गावकऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे.


भिलाईपाडा गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना काही पदार्थ वितरित करण्यात आले होते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता. एक एक करून संपूर्ण गावातील नागरिकांना हा त्रास जाणवू लागला. यानंतर त्या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली.


सध्या, बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित रुग्णालयात दाखल झाले त्यांनाही यावेळी रुग्णांची विचारपूस केली.

Comments
Add Comment

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.