प्राथमिक माहितीनुसार,पहाटेच्या सुमारास अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवला. त्यानंतर एकामागून एक प्रशिक्षणार्थी आजारी पडत गेल्याने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. यामधील १७ जणांवर विशेष उपचार सुरू आहेत, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास १,४०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी मोठ्या संख्येने बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.