Indigo bird strike flight : क्षणात घेतला यू-टर्न! IndiGo विमानाला पक्षी धडक; पायलटच्या निर्णयामुळे २७२ प्रवासी...

नागपूर  : नागपूर विमानतळावर आज एक मोठी घटना घडली. इंडिगो एअरलाईन्सचे नागपूर-कोलकाता हे विमान (फ्लाईट नंबर ६E८१२) उड्डाण करताच अपघातासारखी परिस्थिती निर्माण झाली. उड्डाणानंतर काही क्षणातच एक पक्षी अचानक हवेत आला आणि थेट विमानाच्या इंजिनला धडकला. या धडकेमुळे विमानाचा पुढील भाग (नोज सेक्शन) खराब झाला. ही परिस्थिती पाहून वैमानिकाने तत्पर निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी हवेतच यू-टर्न घेत नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका झाली आहे. या घटनेनंतर विमानाची तात्काळ तपासणी करण्यात आली असून, विमान सेवा कंपनीने प्रवाशांना आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही क्षण काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिकाच्या तात्काळ निर्णयामुळे आणि विमानतळ प्रशासनाच्या सजगतेमुळे मोठा अनर्थ टळला.


इंडिगोचे नागपूर–कोलकाता हे ६E८१२ विमान आज (२ सप्टेंबर) सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण घेतलं. मात्र आकाशात झेप घेताच अचानक एका पक्ष्याने विमानाला धडक दिली. या धडकेमुळे विमानाच्या पुढील भागाचे (नोज सेक्शन) नुकसान झालं. धडकेनंतर वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून तातडीने निर्णय घेतला आणि विमानाला नागपूर विमानतळावरच आपत्कालीन लँडिंग घडवून आणलं. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विमानात माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर आणि काँग्रेस नेते नितीन कुंभलकर हेही प्रवास करत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.



इंडिगो विमान प्रकरणाची चौकशी सुरू


नागपूर विमानतळावर इंडिगोच्या ६E८१२ विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नागपूर–कोलकाता इंडिगो फ्लाईट क्रमांक ६E८१२ वर पक्षी धडकण्याची शक्यता आहे. ही घटना कशी घडली आणि नेमका अपघात कशामुळे झाला, याची चौकशी सध्या सुरू आहे. प्राथमिक तपासणीत धडक झाल्याची चिन्हं दिसून येत आहेत. यासाठी तांत्रिक तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची विशेष समिती काम करत आहे.” या चौकशीतून विमानाच्या नुकसानीबाबत आणि पुढील सुरक्षेच्या दृष्टीने कोणती पावले उचलायची याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, प्रवासी सुरक्षित असल्यामुळे प्रशासनाने दिलासा व्यक्त केला आहे.





पक्षी धडकल्याने विमानवाहतुकीत मोठा धोका


नागपूरमध्ये इंडिगोच्या ६E८१२ विमानाला झालेल्या पक्षी धडकेनंतर विमानवाहतुकीतील ‘बर्ड हिट’ म्हणजेच पक्ष्यांची टक्कर हा धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विमान उद्योगात हा प्रकार गंभीर मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमान जमिनीच्या जवळ असल्याने पक्ष्यांच्या धडकेची शक्यता अधिक असते. अनेकदा पक्षी इंजिनात शिरल्यास इंजिनचे ब्लेड खराब होतात आणि त्यामुळे तांत्रिक बिघाड निर्माण होतो. अशा घटनेमुळे विमानाचे संपूर्ण ऑपरेशन धोक्यात येऊ शकते. म्हणूनच विमानतळ परिसरात नेहमीच पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी उपाययोजना केली जाते. तरीसुद्धा काही वेळा अपघात होतातच. यामुळेच नागपूरच्या घटनेत वैमानिकाने घेतलेला तातडीचा निर्णय म्हणजेच इमर्जन्सी लँडिंग प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.



बर्ड हिटमुळे पुन्हा एकदा उड्डाण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह


नागपूरमध्ये घडलेल्या पक्षी धडकेच्या घटनेपूर्वीही असे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. विशेषत: २ जून रोजी झारखंडच्या राजधानी रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला अशाच प्रकारामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाला उड्डाण घेतल्यानंतर पक्षी धडकला आणि त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण १७५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप होते. या संदर्भात रांचीतील बिरसा मुंडा विमानतळाचे संचालक आर.आर. मौर्य यांनी माहिती देताना सांगितले की, इंडिगोचे विमान सुमारे ३,००० ते ४,००० फूट उंचीवर, म्हणजेच सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर असताना एका पक्ष्याशी आदळले. ही घटना विमान वाहतुकीत पक्ष्यांच्या टक्कर किती गंभीर ठरू शकते याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली होती.

Comments
Add Comment

Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ३ मोठे निर्णय: २,२२८ नवी पदे, ५ लाख रोजगार, ५०० कोटींचा निधी!

हायकोर्टात बंपर भरती; महाराष्ट्र बांबू धोरण २०२५ जाहीर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेसाठी ५०० कोटींची

Govind Pansare : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाकडून तिघांना जामीन; सर्वच्या सर्व '१२' संशयित आरोपींची सुटका!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणासंदर्भात आज एक

Gadchiroli : ब्रेकिंग! गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सरकारला मोठं यश

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने