ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय


ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त !


मुंबई : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि अतिक्रमणांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट सांकेतांक (कोड) देण्याची नावीन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा मिळण्यासह अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळणार आहे.


महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले, “ग्रामीण भागातील रस्ते हे शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहेत. शेतीची कामे आणि शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज आहे. या निर्णयामुळे गावनिहाय रस्त्यांचे सीमांकन होईल, अतिक्रमण हटवले जाईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.”

या निर्णयानुसार, प्रत्येक गावातील ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील सर्व रस्त्यांची यादी तयार केली जाईल. ही यादी ग्रामसभेच्या मान्यतेनंतर तहसीलदारांकडे सादर होईल. तहसीलदार ती भूमी अभिलेख विभागाकडे पाठवतील, जिथे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांचे सीमांकन होऊन हद्दीवर सीमाचिन्हे (boundary pillars) लावली जातील. अतिक्रमित रस्त्यांवर मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ अंतर्गत कारवाई होईल आणि आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाईल. प्रत्येक रस्त्याला जिल्हा, तालुका, गाव आणि रस्त्याच्या प्रकारानुसार विशिष्ट सांकेतांक दिला जाईल.


रस्त्यांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी गाव नमुना नंबर १ (फ) नावाची नवीन नोंदवही सुरू करण्यात आली आहे. तसेच, या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांचा समावेश आहे. या समित्या रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रस्ताव तयार करतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.