व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा


नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी डिसेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्रेमलिनच्या परराष्ट्र धोरण सल्लागार यूरी उशाकोव यांनी या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली आहे. भारत आणि रशियामधील वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेच्या निमित्ताने हा दौरा होणार असून दोन्ही देशांमधील रणनीतिक भागीदारीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंदाच्या वर्षातील पहिली प्रत्यक्ष भेट ३१ ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहयोग संघटना (एससीओ) शिखर परिषदेत होणार आहे. रविवारी 1 सप्टेंबर रोजी ‘एससीओ प्लस’ बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा होईल, अशी माहिती उशाकोव यांनी दिली. भारत आणि रशिया यांच्यात डिसेंबर 2010 मध्ये विशेष रणनीतिक भागीदारीची घोषणा करण्यात आली होती. यावर्षी या ऐतिहासिक भागीदारीची 15 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये होणारी पुतिन यांची भारत भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. उशाकोव यांनी सांगितले की, भारत दौऱ्याच्या तयारीवरही चीनमधील भेटीत चर्चा होईल. अलीकडेच अमेरिकेने भारताकडून रशियन तेल खरेदीवर 50 टक्के टॅरिफ लावले होते. त्यानंतर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून या मुद्यावर चर्चा केली होती. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारत दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. आता क्रेमलिनने या आमंत्रणावर अधिकृत मुहर मारली आहे.


एनएसए अजित डोभाल यांचा मॉस्को दौराया महिन्याच्या सुरुवातीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मॉस्को दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने पुतिन यांना अधिकृत आमंत्रण दिले होते. पुतिन यांनी हे आमंत्रण स्वीकृत केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


Comments
Add Comment

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात

भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि

चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास

तवांग : चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास सुरू आहे. तवांग जिल्ह्यातील सीमेजवळच्या १५० गावांमध्ये

पुन्हा एकदा आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

नवी दिल्ली :  आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले