पंतप्रधान मोदींना जपानमध्ये खास भेट म्हणून मिळाली दारुम बाहुली

टोकियो / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शुक्रवारी (दि.२९) टोकियोमध्ये शोरिंझान दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव सेइशी हीरोसे यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट म्हणून दारुम डॉल दिली. ही डॉल जपानमधील पारंपरिक बाहुली मानली जाते, जी सौभाग्य आणि यश यांचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे, या बाहुलीचं भारताशी एक खोल नातं आहे.

दारुम डॉल ही गोलसर, खोखली आणि हात-पाय नसलेली एक पारंपरिक जपानी बाहुली आहे. तिचं डिझाईन बोधिधर्म या बौद्ध भिक्षूच्या आधारावर तयार करण्यात आलं आहे. सामान्यतः ही बाहुली लाल रंगाची असते, कारण एशियाई संस्कृतीत लाल रंगाला सौभाग्य, समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानलं जातं.

दारुम डॉलचा संबंध भारतातील बौद्ध भिक्षू बोधिधर्म यांच्याशी आहे. असं मानलं जातं की बोधिधर्म दक्षिण भारतातून चीन आणि जपानमध्ये गेले होते, आणि तिथूनच झेन बौद्ध धर्माच्या परंपरेची सुरुवात झाली. जपानमध्ये त्यांना ‘दारुमा’ असं म्हटलं जातं, आणि त्यावरूनच दारुम डॉल या बाहुलीचं नाव पडलं.

म्हणूनच दारुम डॉल ही फक्त जपानी संस्कृतीचा भाग नाही, तर तिचे मूळ थेट भारताच्या बौद्ध धर्माशी जोडलेलं आहे.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात