राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ शिवतीर्थावर पाहायला मिळाली. ज्यामध्ये उबाठा गटातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता. मात्र, यादरम्यान सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती!मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी शिवतीर्थावर येत राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबासह शिवतीर्थावर जात राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर या दोघांनी काही मिनिटे एकत्र घालवत फोटो देखील काढले.


उद्धव ठाकरे गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर राज ठाकरेसोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अलीकडेच एक बैठक झाली होती. त्यानंतर आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही दोघं पुन्हा एकदा भेटली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये इतरही नेते राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे. आजच्या या भेटींमुळे राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी राज्यातील नेते हे राज्याची संस्कृती जपत असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई (वार्ताहर) : राज्यातील काही भागात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम

ठाणे, कडोंमपाची जबाबदारी राज ठाकरेंवर; उबाठा गट मुंबईवरच लक्ष ठेवणार!

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड