एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वी

मुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


याबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, "एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो; परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटीची प्रतिपूर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल!"


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७७.२५ कोटी रुपये देण्यास मान्यता देण्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात