गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी


पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसर, रविवार पेठ, बोहरी आळी परिसरात शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक अडवून ठेवल्याने स्वतः ठाकरे यांच्यासोबत सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले, तर बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई येथे वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणीतून मार्ग काढून खरेदी पुढे मार्गस्थ व्हावे लागले.


गणेश उत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे उभे करण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यातच शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठा असून रस्त्यांलगत असलेल्या मंडपांमुळे रस्ते अरूंद झाले आहेत. शनिवारच्या सुट्टीनिमित्त सहकुटुंब साहित्य खरेदी करण्यासाठी कुटुंबासमवेत बाहेर पडलेल्या नागरिकांनी मंडई, तुळशीबाग, नारायण पेठ, अप्पा बळवंत चौक, कसबा या ठिकाणी गर्दी झाल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या परिसरात वाहनतळांवर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.


मध्यभागासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी, हडपसर, केशवनगर, मुंढवा या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्यातच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी बेशिस्तपणे गल्लीबोळात वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.


मंडप उभारण्यासाठी बांबू, लोखंडी कमानी, साचे यांचे साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने रस्त्यांलगत उभी राहिल्याने तसेच हे साहित्य रस्त्यांच्या कडेला पदपथांवर टाकल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले. जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, डेक्कन, आपटे रस्त्यावरही वाहतूक मंदावल्याचे पाहावयास मिळाले.



पाच महिन्यांनंतर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला


पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा भिडे पूल महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) कामामुळे गेल्या पाच महिन्यांपासून (२० एप्रिल) बंद ठेवण्यात आला होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणसाखळीतून सुमारे २० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूलावरून पाणी ओसंडून वाहत होते. पाऊस थांबल्याने पाणी ओसरल्याने आणि गणेशोत्सवामुळे वाहनांची गर्दी होत असल्याने अखेर हा पूल शनिवारी (२३ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’