मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात झालीय. राज्यात २८, २९, ३० आणि ३१ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर कोकणात २८ ऑगस्टला अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सोमवारी सकाळपासून मुंबईसह, ठाणे आणि उपनगरातही रविवारपासून पाऊस आहे. पावसामुळे पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे.

याचा परिणाम गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. त्याशिवाय मुंबईत अनेक मंडळांच्या गणपती बाप्पांचं रविवारी वाजत गाजत आगमन होत आहे. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसते आहे.

मुंबईत पावसाचा लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम लोकल ट्रेनवर झालेला आहे. हार्बर ट्रेन उशिराने धावत असून मध्य रेल्वेवरही वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे.

मुंबईत सकाळपासून पावासाने हजेरी लावली असून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २८ ऑगस्ट रोजी अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Comments
Add Comment

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन !

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ३ या

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून