मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. लेखक-दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव आणि मानवी नात्यांचे भावनिक पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपटाची कथा एका सामान्य कुटुंबातील वडिल आणि त्याच्या मुलीच्या नात्यावर आधारित आहे. विशेष म्हणजे, ही गोष्ट एका नक्षलवाद्याच्या जीवनावर केंद्रित असून त्याच्या मुलीशी असलेल्या नात्याचा हळुवार बाजूने वेध घेतला आहे. हिंसेच्या मार्गाऐवजी शिक्षण व शांततेचा स्वीकार करणाऱ्या प्रवासाची ही कहाणी आहे.


एस. एस. स्टुडिओ आणि एक्सपो प्रेसेंट या बॅनरखाली शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत हृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्या भूमिका असतील. चित्रपटातील संगीत हे आदिवासी लोककलेवर आधारित असून, त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि अस्सल अनुभव मिळेल.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल, असा मला विश्वास आहे. यांची 'एक तिकीट, एक वृक्ष ' लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.''


चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी सांगितले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चे पोस्टर अनावरण होणे हा आमच्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील सिनेमापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनापासून केलेला प्रयत्न आहे.” हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, ही आमची मनापासूनची इच्छा आहे.”

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत