मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतो त्या शिवाजी महाजारांनी कायम माताभगिनींचा आदर केला आहे. जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढताना मुख्यमंत्र्यांच्या आईविषयी अपशब्द वापरू नये. ते जर अशी हिंमत करणार असतील तर त्यांची वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची धमक आमच्यासारख्या ९६ कुळी मराठ्यांमध्ये आहे हे लक्षात ठेवावे; असा निर्वाणीचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन केले आहे. आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीवजा इशारा देताना त्यांच्या आईचा उल्लेख करत जरांगेंनी काही शब्दांचा वापर केला. जरांगेंच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. जरांगेंच्या वक्तव्यानंतर आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करू शकते. पण आंदोलनाच्या निमित्ताने कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही; अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार चित्रा वाघ या सर्वांनीच जरांगेंच्या आक्षेपार्ह भाषेचा जाहीर निषेध केला.
जरांगेंना प्रसाद लाड यांचा निर्वाणीचा इशारा
https://www.youtube.com/shorts/IyFHOmSycCU
जरांगेंच्या त्या वक्तव्यावर काय म्हणाले दरेकर ?
https://www.youtube.com/shorts/6TFrbNDzpbg