जैसलमेरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघा गावात तलावाजवळ खोदकाम करताना स्थानिकांना मगरीच्या आकारासारखे दिसणाऱ्या अस्थी सापडल्या. ज्याची माहिती मिळताच फतेहगड उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि अवशेषांची पाहणी केली. त्या दरम्यान तलावाजवळ आढळलेले अवशेष हे डायनासॉरच्या पाठीचे कण्याचे हाडे असावेत असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) खात्याद्वारे हे जीवाश्म डायनासॉरचे नसून, फायटासॉरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
#WATCH जैसलमेर, राजस्थान: जैसलमेर में मगरमच्छ जैसा दिखने वाला 201 मिलियन वर्ष पुराना फाइटोसौर जीवाश्म खोजा गया। pic.twitter.com/PZ5lBEmayC
— ANI_HindiNews (@AHindinews) August 25, 2025
जैसलमेरमध्ये गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे अनेक जीवाश्म सापडले आहेत. ज्यात थियटमधील हाडांचे जीवाश्म, डायनासोरच्या पावलाचे ठसे आणि २०२३ मध्ये सापडलेले एक चांगले जतन केलेले डायनासोरचे अंडे यांचा समावेश आहे. मेघा गावातील प्राचीन तलावाजवळील हा शोध कदाचित या प्रदेशातील डायनासोरशी संबंधित पाचवा शोध असेल.