रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले म्हणून एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरीच्या उद्यमनगरमध्ये घडली आहे.


रेहान अस्लम कापडी (वय १५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, जो कॉन्व्हेन्ट शाळेत १० वी अ मध्ये शिकत होता. युनिट टेस्टमध्ये रेहानला कमी गुण मिळाले होते. यावरून त्याच्या आईने त्याच्या पुढील शिक्षणाची आणि भविष्याची चिंता व्यक्त करत त्याला समजावले.


आईच्या या शब्दांनी रेहानच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्याने स्वतःला घरातल्या खोलीत कोंडून घेतले आणि पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले. रेहानच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


त्याच्या वडिलांचा व्यवसाय सी-मॅन असून त्याला दोन बहिणी आहेत. एका क्षणाच्या नैराश्यातून घेतलेल्या या निर्णयामुळे एका उज्वल भविष्याचा अंत झाला, तसेच संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. ही घटना शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर येत असलेल्या मानसिक दबावाकडे लक्ष वेधते आणि पालकांना तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण