चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल कोसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून 1965 च्या सुमारास हा ब्रीज बांधण्यात आला होता. हा पूल जीर्ण झाल्याने कोसळल्याचा अंदाज आहे.



हा ब्रिज नवीन बांधण्यासाठी प्रस्ताव एमआयडीसीकडे देण्यात आल्याची माहिती चिपळूण तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूणमध्ये येणार असून पुलाची पाहणी करणार आहेत.


घटना घडल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी रात्री सर्व माहिती घेऊन प्रशासनाला सूचना केली आहे. खडपोली, गाणे आदी गावांकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असून पर्यायी मार्गावरून अवजड वाहने वाहतूक करू शकत नाहीत. पिंपळी-खडपोली-दसपटी या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा ब्रीज कोसळला तेव्हा दैव बलवत्तर म्हणून या पुलावर कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


मुसळधार पाऊस सुरू होता गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र शनिवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. याचा फटका सगळ्यात जुन्या असलेल्या खडपोली एमआयडीसी व काही गावांकडे जाणाऱ्या मोठ्या पुलाला बसला.


1965 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता. हा ब्रिज तब्बल 60 वर्षे जुना झाला होता. त्यामुळे हा ब्रिज कमकुवत झाला होता. याया सगळ्या दुर्घटनेची गंभीर दखल चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी घेतली असून त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.


Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात