'चाकरमानी' नाही 'कोकणवासी' म्हणा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश


मुंबई : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे 'चाकरमानी' असे म्हणायचे नाही तर 'कोकणवासी' संबोधित करायचे असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. लवकरच या संदर्भातले परिपत्रक काढण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. वर्षानुवर्षे कोकणवासीयांना चाकरमानी म्हणत होते पण हे अवमानकारक असे संबोधन सरकारी कामकाजातून हटवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे.


'चाकरमानी' हा शब्द कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. गेल्या अनेक दशकांपासून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. या नागरिकांनी गावाशी असलेली नाळ जपली आहे. शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांच्या निमित्ताने ही मंडळी गावी जाऊन येतात. गावाकडे त्यांचा उल्लेख 'चाकरमानी' असा करतात.


प्रत्यक्षात 'चाकरमानी' हा शब्द चाकर म्हणजेच सेवक आणि मानी म्हणजेच मालकाचे आदेश मानणारा किंवा पाळणारा अशा अर्थाने तयार झाला आहे. कोकणवासीयांच्या काही संघटनांना हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी चाकरमानी या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते, हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकार कडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या सांस्कृतिक ओळखीला सन्मान देण्यासाठी कोकणवासी हा शब्द वापरण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या

BMC: रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करा

अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी):