BMC: रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करा

अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी):  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर आणि अधिक सक्षम राहायला हवे. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या. तसेच रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचनाही लवंगारे यांनी दिल्या. (Brihanmumbai Municipal Corporation)


जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी शनिवारी १८ जुलै २०२६ रोजी भेट देत आरोग्यविषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या एस. के. पाटील, एम. डब्ल्यू. देसाई आणि सिद्धार्थ रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी आढावा घेतला.यावेळी उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, परिमंडळ ४ मधील सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (Monsoon 2026)


परिमंडळातील उप आयुक्त तसेच सर्व सहाय्यक आयुक्त यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रत्येक प्रभागातील आरोग्यविषयक प्राधान्यक्रम निश्चित करावेत. त्यानुसार आरोग्यविषयक बाबींचा नियमित आढावा घ्यावा तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करावी. महानगरपालिकेच्या एकूण आरोग्यविषयक धोरणाशी सुसंगत असलेल्या नवीन उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या. (Municipal Hospital)



पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकामस्थळांची पाहणी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. झोपडपट्टी परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आदी पावसाळी व साथीच्या आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यासोबतच त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विशेष मोहीम राबवावी. यासाठी उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश लवंगारे यांनी दिले.


आरोग्यविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख
परिमंडळ-४ मधील सर्व सहायक आयुक्त तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आरोग्यविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवावी. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS), भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, आरोग्य सुविधांच्या ठिकाणी आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे तसेच आरोग्य केंद्रांमधील स्वच्छतेच्या उपक्रमांचा नियमित आढावा घ्यावा. सहायक आयुक्तांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन कामांची पाहणी करावी. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे निर्णय घेण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. सहायक वैद्यकीय अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदी आरोग्यविषयक रिक्त पदे विहित प्रक्रियेचे पालन करून शक्य तितक्या लवकर भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.



आरोग्य संस्था सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य


विभागातील आरोग्य सुविधांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रूग्‍णालय पायाभूत सुविधा कक्षाने धोरण तयार करावे. विभागाला एकक मानून दुरुस्तीची कामे मिशन मोडवर जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.


दफनभूमींमधील स्वच्छता व देखभालीचा आढावा
दफनभूमींची स्वच्छता, अतिरिक्त आवश्यक सुविधा तसेच देखभालीशी संबंधित बाबींचा आढावा घेऊन त्यानुसार आवश्यक नियोजन आणि कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी लवंगारे यांनी यंत्रणेला दिल्या. ( Maharashtra News)

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.